धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी नववर्षानिमित्त धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनने महाकवी कालिदास यांची अजरामर कलाकृती शाकुंतल या नाटकाचे नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन केले होते.
पुणे येथील मराठी भाषा संवर्धन मंडळ निर्मित या शाकुंतल नाटकाचा मराठी अनुवाद / रंगावृत्ती गणेश दिघे यांनी केलेला आहे. तसेच अनिकेत अदिनाथ नेमाने यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलेले होते. प्रमुख भुमिकेत शुभम मारडकर,समृद्धी भोसले, युक्ता नाईक, प्रतिक्षा कदम,पराग जगताप यांच्या होत्या. मुळ धाराशिवच्या पण पुणे येथे वास्तव्य असलेल्या प्रा. माया मुळे या नाटकाच्या संयोजिका होत्या.धाराशिवची कन्या श्वेता आनंद कुलकर्णी हिने पण या नाटकात भूमिका साकारली होती. सर्व धाराशिव शहरातील प्रतिष्ठित रसिकांनी या नाटकाचा आस्वाद घेतला. धारासूर मर्दिनी फेडरेशनच्या ह्या वेगळ्या उपक्रमाच्या आयोजनबद्दल सर्व कार्यकारिणीचे कौतुक केले.