कळंब / शहरात रोज शेकडो महिला पुरुष , वृद्ध नागरिक सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी पहाटे साडेचार वाजल्यापासून केज, ढोकी, येरमाळा, मोहा या रस्त्यावरती पाई मॉर्निंग वॉक करत असतात. अशातच दि. 19 एप्रिल रोजी केज रोड वरती मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलांच्या गळ्यातील काही तरुण चैन हिसकावण्याच्यावेळी महिलांनी आरडा ओरडा केला. तात्काळ काही मॉर्निंग वॉक करणारे पुरुष धावले. त्यामुळे अनार्थ टाळला. लागली चोर पसार झाले. यासाठी कळंब पोलिसांनी शहराच्या चारी रोडवरती पहाटे साडेचार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत राऊंड साठी काही पोलीस शिपायांची नेमणूक करावी. अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
कळंब शहरातील शेकडो महिला पुरुष हे सकाळी सकाळी शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडतात. काहीच्या गळ्यामध्ये सोन्याचे दागिने असतात. काहीच हातात अंगठ्या असतात. तरी ही तसेच बाहेर पडतात काहीजण एकटे एकटे फिरतात. तर काहीजण ग्रुपने फिरतात. अशाच संधी साधून चैन चोर आपला डाव साधून घेतात. अशावेळी बंदोबस्त करण्यासाठी कळंब पोलिसांची एक ग्रस्त पथक नेमले जावे अशी मागणी नागरिकांत जोर धरत आहे.
सकाळी मॉर्निंग वॉक साठी फिरणाऱ्या महिला, पुरुष यांनी आपल्या गळ्यातील हातातील मौल्यवान वस्तू या घरीच ठेवून शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडावे असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी केले आहे . जेणेकरून चोरांना यापासून काही मिळणार नाही अशा चोरांचा आपण तात्काळ बंदोबस्त करू .उपविभागीय पोलीस अधिकारी - संजय पवार
कळंब शहरात रात्रीचे गस्त घालणारे पोलीस हे किती वेळ पहाटे गस्त घालतात हे माहीत नाही पण पहाटेच्या वेळी पोलीस दलाने या चारी रस्त्यावर किमान दोन-दोन तरी पोलिसांची नेमणूक करावी जेणेकरून अशा चोरांना आळा बसेल. - आमोल वाकचौरे
कळंब पोलीस स्टेशनला मुळातच मॅन पावर कमी आहे. त्याच पूर्ण डोलारा चालवा लागत आहे. जयंती ,मिरवणुका आणि रात्रीची गस्त हे पूर्ण करावी लागत आहे. त्याच आहे त्या कर्मचाऱ्यावर हँडल करावा लागत आहे. जेवढी पटसंख्या कळंब पोलीस स्टेशनला नेमून दिलेले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने पोलिसांची संख्या कमी आहे. तरीही नागरिकांच्या मागणी नुसार आपण सकाळच्या गस्तीसाठी काही माणसाची नेमणूक करून चोरांचा बंदोबस्त करू.
पोलीस निरीक्षक - रवी सानप