धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्य,कला,क्रीडा, ऐतिहासिक,पर्यटन समाजकारण,गायन राजकारण अशा विविध क्षेत्रात अष्टपैलू  व्यक्तिमत्वाचे युवराज नळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजवादी नेते  पन्नालालजी सुराणा आणि नागोराव कुंभार   यांच्या हस्ते नुकतेच सन्माननीत करण्यात आलेले असून युवराज नळे लिखित “ मराठवाडा  नव्हे, भारताचा मुक्ती संग्राम“ या शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय पुरस्कार ही नुकतेच पुणे येथे प्रदान करण्यात आला, त्याच प्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथेही खुल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष हे सन्मानीय पद भूषविले. या समग्र कार्याचा आढावा घेऊन कलाविष्कार अकादमी , मेलडी स्टार्सच्यावतीने  युवराज नळे व सौ. वर्षा नळे या दांपत्याचा  सन्मान करण्यात आला. यावेळी  सत्काराला दिलेल्या उत्तरात सर्वांना धन्यवाद देताना जीवन जगत असताना कायम  मनमोकळे,साहित्य, गायन , मित्रत्वाचे नाते दृढ होईल असे प्रयत्न केले पाहिजेत तसेच ताण विरहित जगणे ही काळाची गरज ठरली आहे म्हणून एकत्र येऊन सांस्कृतिक ,सामाजिक  कार्यात असले पाहिजे असे कथन युवराज नळे यांनी केले. या सन्मान कार्यक्रमात सहसमन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कलाविष्कार मेलडी स्टार्स चे समन्वयक शरद वडगावकर प्रभाकर चोराखळीकर, महारुद्र मोरे, रविंद्र कुलकर्णी, ॲड. दीपक पाटील मेंढेकर, धनंजय कुलकर्णी, नितीन बनसोडे, घनश्याम पाटील, महेश उंबर्गीकर, मारूती लोंढे, सुशील कुलकर्णी, सौ.वर्षा नळे, सौ. तारा मोरे, सौ. राजश्री निंबाळकर तसेच मल्हार माने यांच्या सुविद्य पत्नी आणि रुपामाता बँकेच्या संचालिका महानंदा माने,  शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, भारत देवगुडे, निसर्ग योगा वर्गाचे योगशिक्षक सूर्यकांत आनंदे, सुभाष  पवार, ॲड. बय्याजी साबणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
Top