तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तामलवाडी येथे बालाजी अमाईन्स प्रा लि तामलवाडी यांच्या वतीने तामलवाडी येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये सीएसआर फंडातुन ऐक कोटी रुपयाचे सिमेंटरस्ते काम पुर्ण केल्याने या भागात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याने ते बालाजीअमाईन्सप्रालि कंपनी चा संचालक मंडळीना धन्यवाद देत आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे गाव अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने ग्रामपंचायत ने बालाजीअमाईन्सप्रालि कंपनी कडे सिमेंट रस्ते कामा बाबतीतमागणी केली असता व्यवस्थापकीय संचालक ऐ प्रताप रेड्डी राजेश्वर रेड्डी राम रेड्डी यांनी तात्काळ मान्यता दिला नंतर लगेच काम सुरु करण्यात आले वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये 22ते 24सिमेंट रस्तेदर्जदार केले. वार्डक्रमांक ऐक व दोन मध्ये सिमेंट रस्ता साठी ग्रामपंचायत ने प्रशाषणाने मागणी केली आहे, यास मंजुरी कधी मिळणार या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे,