तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष अमर भैया मगर, माजी नगरसेवक तुळशीदास साखरे,एड.  रामचंद्र ढवळे, नगरसेवक सुनील ( पिंटू ) रोचकरी, बाळासाहेब कदम,, प्रताप कदम, माजी नगराध्यक्ष पंडित जगदाळे, सागर कदम, विकास हावळे यांचे सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मधुकरराव चव्हाण म्हणाले की शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा नारा डॉ. बाबासाहेबांनी सर्वांना दिला. दिन दलित पिचलेल्या वर्गाला न्याय देण्याचे, सन्मान देण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. देशाची राज्यघटना लिहीत असताना समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसाचा त्यानी विचार केला. त्यामुळेच आज आपण सर्वजण गुण्या गोविंदाने नांदत आहोत. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार मिळाले. जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्याकाळी त्यांच्या लायब्ररीमध्ये 20000 पेक्षा जास्त पुस्तके होती. माणसाला माणुसकीची शिकवण त्यांनी दिली. त्यामुळेच ते महामानव झाले. ते थोर अर्थशास्त्रज्ञ समतावादी नेते होते. त्यांची शिकवण आचरणात आणून त्याप्रमाणे समाजात वागणे हीच त्याना खरी आदरांजली होईल. यावेळी सर्वांनी जय भीमचा नारा दिला.

 
Top