तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा सोहळा विधी शनिवार दि. 12 एप्रिल रोजी संपन्न होणार आहेत.
श्री तुळजाभवानी देविजींचा चैत्र पौर्णिमा महोत्सव 2025 दिनांक 11 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे. चैत्र पौर्णिमा महोत्सव कालावधीत भाविकांची संख्या खुप मोठया प्रमाणात असल्याने भाविकांना श्री देवीजींच्या दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी म्हणून दि.10 एप्रिल 2025 रोजीचे मध्यरात्री 12 वाजले पासून भाविकांना बिडकर पायऱ्या येथून मंदीरात दर्शनार्थ सोडण्यात येणार आहे.
चैञी पोर्णिमा यात्रेनिमित्त शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी रात्रौ छबिना. शनिवार दि. 12 एप्रिल रोजी रात्रौ चैञी पोर्णिमेचे धार्मिक विधी, छबिना व जोगवा संपन्न होणार आहे. रविवार 13 एप्रिल रोजी रात्रौ छबिनासंपन्न होणार आहे. तरी याची सर्व पुजारी, महंत, सेवेकरी व भाविकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन अरविंद बोळंगे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे. यंदा कडक उन्हाळा असल्याने भक्तांसाठी ही याञा कृष्टदायक ठरणार असली तरी प्रशासकीय पातळीवरही याञा सुसाह्य करण्यासाठी पुर्वतयारी सुरु आहे. सध्या मंदीर संस्थान, नगर परीषद, विद्युत विभाग, पोलिस विभाग आपआपले नियोजित कामे करीत आहेत.
गाभाऱ्यात फक्त अभिषेक करावेत
श्री देवीजींच्या अभिषेक पुजेवेळी अभिषेकाव् यतिरिक्त इतर विधी गाभाऱ्यात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अभिषेक रांगेची गतिमानता कमी होत आहे. अभिषेक पुजेच्या वेळी श्री देवीजींच्या मुख्य गाभाऱ्यात फक्त अभिषेक घालण्यात यावेत. भाविकांना अभिषेका व्यतिरिक्त विधींसाठी श्री देवीजींच्या गाभाऱ्यात थांबवून ठेवू नये.असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे.