धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती प्रा.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या 3 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोलापूर येथून मोटारीने सकाळी 7.45 वाजता तुळजापूर येथे आगमन व आई तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतील.सकाळी 8.30 वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन.सकाळी 9 वाजता तुळजापूर देवस्थानाबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतील.सकाळी 10.30 वाजता धाराशिवकडे प्रयाण करतील.सकाळी 11 वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे आगमन.सकाळी 11 : 30 वाजता शिवसेना पदाधिकारी यांचे समवेत बैठक घेतील.दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,सभागृह येथे भूकंपग्रस्त भागात सामाजिक वनीकरण,उन्हाळ्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन,जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आणि अमली पदार्थविरोधी कार्यक्रमाचा तसेच ऊसतोड महिला कामगार योजनेबाबतचा आढावा घेणार आहे.सायंकाळी 5 : 30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषद घेतील व सायंकाळी 6 : 30 वाजता शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.

 
Top