तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील सर्वे नंबर 207/2 भुखंड क्रमांक 28बाबतची तक्रारी नंतर गुंठेवारी स्थागित करण्यात आली असुन या प्रकरणी सात दिवसाचा आत खुलासा सादर करावा. अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकारी यांनी काढली आहे.
तुळजापूर शहरातील सुरज बंडू कानडे यांची सर्वे नंबर 207 /2 प्लॉट नं.28 ची तुळजापूर नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस गुंठेवारी केले आहे. अशी तक्रार नगरपरीषदला दिली.
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांना दि.30 /04 /2024 रोजी संदर्भ क्र.2 व 3 अन्वये आपल्या कार्यालयाकडून तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्वे नं.207/2, प्लॉट क्र.28 चे पोटहिस्सामध्ये असलेल्या वहिवाटीप्रमाणे मोजणी करून मोजणी शीट सादर करावे. मात्र सदरील अभीलेख व मोजणी अर्जाची तपासणी केली असता मौजे तुळजापुर येथील सर्वे न 207/2 प्लॉट न 28 ची गुंठेवारी मोजणी झालेली दिसुन येत नाही. तसेच गुंठेवारी शासन परीपत्रक जमाबंदी आयुक्त आणी संचालक भुमी अभीलेख पुणे यांचे दि. 16/12/2003 चे परीपत्रक अन्वये मोजणी अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला दिसुन येत नाही त्यामुळे मोजणी नकाशा पुरवीता येत नाही. असे पत्र नगरपालिकाला उप भूमि अभिलेख कार्यालयाने दिले. संबंधित नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी बोगस गुंठेवारीकेलेली समोर आली आहे. या तक्रारी ची दखल घेत मुख्याधिकारी यांनी गुंठेवारीस्थगित करुन सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदैश दिले.