तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहर विकास प्राधिकरणातंर्गत होणारा रस्ता हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा लवकरात लवकर होण्याचा मागणी साठी महाविकासआघाडी वतीने सोमवार दि 8रोजी नगरपरीषद समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी यांनी कलम 37 अंतर्गत स्थगित आहे आणी या रस्त्याची फाईल मंत्रालयामध्ये आहे. तरी ती निकाली काढण्यासाठी प्रयत्न करु व महिन्याच्या आत काम सुरू करू असे आश्वासन यावेळी आंदोलन स्थळी येवुन मुख्याधिकारी यांनी दिली. हे आश्वासन न पाळल्यास याहीपेक्षा तिव्र आंदोलन करून मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोका असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला. यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील, रुषी मगर, नागनाथ भांजी, अमोल कुतवळ, सेनेचे शाम पवार, शेकापचे उत्तम अमृतराव, शिवसेना शिंदे गटचे अमर परमेश्वर, प्रशांत सोंजी, रणजित इंगळे, आनंद जगताप, अजय सांळुके सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.