तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा येथील जगदंबा नगर मधील महिलांनी पाणीपुरवठा  विस्कळीत झाल्याने जगदंबा नगर महिलांनी ग्रामपंचायतला  सोमवारी कुलूप ठोकले होते ते आजही तसेच असल्याने ग्रामस्थांना कामासाठी लागणारे कागदपत्रे मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.

ग्रामपंचायत कार्यालय सोमवार पासुन आजपर्यत कुलुपबंद आहे. त्या ग्रामसेवक सरपंच यांना ग्रामपंचायत मध्ये प्रवेश कर्ता येत नसल्याने ग्रामस्थांचे अनेक महत्वाची कामे खोळंबली आहेत. ग्रामपंचायतला कुलुप असल्याने यशवंतराव चव्हाण जयंती कुलुपबंद ग्रामपंचायत दरवाजा समोर फोटो लावुन साजरी करावी लागली. मागील तीन दिवसापासुन ग्रामपंचायतला लावलेले कुलुप काढुन ग्रामपंचायतचा कारभार सुरु करुन ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

 
Top