धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सांजावेस गल्लीतील जंगम मठ येथे महिला दिनाच्या औचित्याने महिलासाठी सर्व रोग निदान शिबीर मंगळवारी (ता. 11)संपन्न झाले. शुभांगी पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. अनार साळुंखे, कमलताई नलावडे, डॉ. अनुराधा गरड, माजी नगरसेविका तेजामती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात शुगर, रक्तदाब, वेगवेगळ्या कर्करोगाच्या चाचणी घेण्यात आल्या. कर्करोगाच्या चाचणीचा 108 महिलांनी लाभ घेतला. इतर वेगवेगळ्या चाचणीचा 200 पर्यंत महिलांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. रमेश जावळे, डॉ. अश्विनी चौधरी, डॉ. सानिया टीनवाला या तपासणी केली. पंकज पाटील यांच्या पुढाकारातून हे शिबीर आयोजित केले होते. तर प्रणिता पाटील, दीप्ती पाटील, मंजूश्री पाटील, पूजा मुंडे पाटील, सोनल पाटील यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.