तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरातील बाहेर पडण्याचा मार्ग कामास आरंभ होवुन जिर्णोध्दार कामास आरंभ झाला आहे. शाकंभरी नवराञ उत्सव नंतर पोर्णिमा होताच जिर्णोध्दार कामास वेग येणार आहे. सध्या मंदीराचा स्वनिधीतुन जिर्णोध्दार काम केले जात आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीरातील श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन भाविकांनी घेतल्यानंतर त्यांना मातंगी देवी मंदीराकडुन बाहेर पडण्याचा मार्ग तयार करण्याचा कामास आरंभ करण्यात आला आहे. सध्या राजमाता माँ जिजाऊ महाव्दार लगत पासुन वरुन खाली असे नव्या कामास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर राजमाता माँ जिजाऊ महाव्दार मधुन भाविकांना प्रवेश बंद केला आहे.
हा बाहेर पडण्याचा मार्ग हा स्टेडीयम पायऱ्या पाडून तेथुन पोलिस चौकी ते जुने प्रशासकीय कार्यालय पाडुन राजमाता म़ाँ जिजाऊ महाव्दार बाजुला काढण्यात येणार आहे. हा मार्ग तयार करताना मंदीरातील उपदेवता असलेल्या श्रीदत्त पादुका मंदीर व श्रीगोमुख तिर्थकुंडे येते.
श्रीतुळजाभवानी मंदीर पुरातन लुक देण्याचे जवळपास सत्तर टक्के काम झाले आहे. गुढीपाडव्या पर्यत भाविकांची वर्दळ कमी असते. त्यानंतर उन्हाळा सुट्यात वाढते. या पार्श्वभूमीवर हे पाडकाम सुरु केले आहे. भवानीशंकर मंडप जिर्णोध्दार काम शारदीय नवराञोत्सव पोर्णिमे नंतर केले जाणार आहे. तर मंदीर मुख्य गर्भगृह व कळस शिखर काम जैसे थे ठेवायाचे की पाडुन करायाचे याचा निर्णय केंद्रीय पुरातत्व विभागाचा तज्ञ मंडळीनी पाहणी करुन अहवाल दिल्या नंतर घेतला जाणार आहे.
सध्या माञ श्रीतुळजाभवानी मंदीरातुन देवीदर्शन करुन बाहेर पडण्याचा मार्ग काम सुरु केले आहे. हे काम मंदीर स्वनिधीतुन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जुने प्रशासकीय कार्यालय पाडण्याचे काम सुरु केले आहे. श्रीक्षेञ विकास आराखडा मंजूर प्रस्ताव मंञालयात मंजूरीसाठी दाखल आहे. यास लवकरच मुख्यमंत्री यांची मंजूरी मिळेल अशी प्रतिक्रिया विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.