धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि छत्रपती संभाजी नगर येथील यशस्वी अकॅडमी यांच्यात नुकताच नोकरी संदर्भात सामंजस्य करार केला आहे.
येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी मिळाव्यात म्हणून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि छत्रपती संभाजीनगर येथिल यशस्वी अकॅडमी यांनी नुकताच करार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमीक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते आणि यशस्वी अकॅडमीचे प्रमुख अमित टाकले, प्रा.आर.एम.शेख, प्रा.राजकुमार टेकाळे-पाटील, यशस्वी अकॅडमीचे किशोर जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की, या करारामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. विद्यार्थ्यांमध्ये पदवी सोबतच अंगभूत कौशल्यासाठी सातत्यपूर्ण कौशल्यावर आधारित विविध प्रोग्राम वर्षभरामध्ये घेतले जातात. या विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डी.डी. दाते यांचेही भाषण झाले.