तुळजापूर (प्रतिनिधी)- भवानी शंकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, शक्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्था व विनोद गंगणे मित्र परिवार यांच्या सौजन्याने आयोजित भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा 2025 शक्ती महाकरंडक स्पर्धचे उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात रविवार दि. 23 मार्च रोजी सांयकाळी संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात लवकरच नाट्यगृह उभारणार असल्याचे सांगुन राज्यातुन आलेल्या स्पर्धकांचे स्वागत करतो. स्पर्धा घेण्यास ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानतो असे यावेळी म्हणाले. यावेळी अविनाश गंगणे, नरेश अमृतराव, शांताराम पेंदे, अमर हंगरगेकर, श्रीकांत कदम, ज्ञानेश्वर गवळी, गोपाळ पवार, प्रतिक वाघे, प्रकाश मगर, महेंद्र कावरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पञकार संघाचे जिल्हा उपाअध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम यशस्वीते साठी अभिजीत पवार, जगदीश पाटील, विशाल टोले, रतन मस्के, सारंग कावरे, नागनाथ इंगळे, जयदेव इंगळे, रुषीकेश गवळी प्रथम रेणके यांनी परिश्रम घेतले.