कळंब (प्रतिनिधी)-आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी आदेशित केले होते. त्याअनुषंगाने कळंब तालुका शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जास्तीत जास्त शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी द्वारे गावाखेड्यातील प्रत्येकाला शिवसेनेसोबत जोडण्यासाठी, शिवसेनेचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सांगण्यात आले. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेंच नगर परिषदच्या निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटन बांधणीसाठी शनिवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कळंब व धाराशिव शहरासाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. येणाऱ्या काळात देखील शिवसेनेच्या माध्यमातून कळंब धाराशिव मतदारसंघाचा विकास कसा होईल यासाठी शासन दरबारीं आपण प्रयत्नशील राहणार आहोत, असे धाराशिव कळंबचे शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी सांगितले.
यावेळी या बैठकीला उपस्थित राज्यपातळीवरील पदाधिकारी पार्थ दास यांची विशेष उपस्थिती होती. यासह शिवसेना नेते अजित पिंगळे, मा.नगराध्यक्ष शिवाजी कापसे, तालुकाप्रमुख. लक्ष्मीकांत हुलजुते, अनंत वाघमारे, ईश्वर शिंदे, गजानन चोंदे, संदीप मडके, गोविंद आवाड, चंद्रसेन अडसूळ, अमोल माकोडे, अतुल कवडे, अमोल पाटील, रोहन पारख, दिनकर काळे, सुरेश शिंदे, बालाजी घुमरे, सुमित रणदिवे, दत्ता शेंडगे, आत्माराम लकडे, डॉ. बंडू तावरे, नारायण टेकाळे, राहुल चोंदे, किरण बोराडे, पिनू जाधवर, राजेश गोरे, आप्पा सावंत, विनोद चव्हाण, पोपट अंबिरकर, किरण पाटील, अनंत लंगडे ला, परमेश्वर खडबडे आदी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.