तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मौजे मोर्डा येथे  जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा व आंबा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली. मोर्डा येथील बालाजी पवार यांच्या फाँर्म हाऊसवर या या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

प्रारंभी  या कार्यशाळीची प्रस्तावना महेश देवकाते तालुका कृषि अधिकारी तुळजापूर यांनी केली. यावेळी त्यानी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा व आंबा व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला.  या कार्यशाळेस उद्घाटक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धाराशिव रविंद्र माने यांनी उपस्थित राहून त्यानी जिल्हास्तरीय पौष्टीक तृणधान्य याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच मँगोनेटचे निर्यात मधील महत्त्व सांगून धाराशिव जिल्यातील 1100 शेतकऱ्यांचे नोंदणी झाल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र डॉ सचिन सूर्यवंशी  यांनी सविस्तर माहिती सांगितली. प्रा.अपेक्षा कसबे यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्यांची विविध तयार करायचे पदार्थ यांची माहिती सांगितले. सचिन नलवडे अध्यक्ष महादेश फार्म्स यांनी आंबा फळबाग लागवड व विक्री व्यवस्थापन यांची माहिती सांगितली. डॉ केशव सरगर यांनी आंबा बहार व्यवस्थापन व रोपांची निगा राखणे यांची माहिती सांगितली. डॉ श्रीकृष्ण झगडे यांनी आंबा पीक सरक्षण व उपाययोजना यांची माहिती सांगितली. यावेळी  बालाजी पवार अभिरुची फार्म, मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले, श्री विठ्ठल नागटीळक मंडळ कृषि अधिकारी श्रीमती पल्लवी काटकर, श्रीमती दीपाली सरवदे उपस्थित होते. या कार्यशाळेस सर्व कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक तसेच धाराशिव जिल्यातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चादरे यांनी केले.

 
Top