तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता शासकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहीती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. हा निर्णय होताच याचे श्रेय घेण्यासाठी भाजप व महाविकासआघाडी मध्ये श्रेयवादाची लढाई लागली आहे.
महाविकास आघाडीच्या मागणीला यश आल्याचा दावा केला आहे. मध्यतंरी हे क़ालेज बंद होण्याचा शक्यतेने शासनाने कॉलेज चालविण्यास घ्यावे पण बंद करु नये यासाठी महाविकास आघाडीने या बाबतीत आंदोलन केल्याचा दावा केला आहे. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यानंतर तात्कालीन उच्चशिक्षण मंञी विनोद तावडे यांनी लक्ष घातले. नंतर यात लक्ष घातले पाठापुरावा केला. अखेर याला यश येवुन उच्चशिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवुन यात पुढील शैक्षणिक वर्षापासुन हे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी शासकीय काँलेज करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार हा आपल्या हक्काचा सरकारने मार्गी लावल्याची प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
या निर्णयाचे सर्वच स्तरातुन माञ स्वागत होत आहे.