तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरीषद परिषदेला अखेर तब्बल अडीच वर्षानी अजिंक्य रणदिवे यांच्या रुपाने पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळाल्याने तुळजापूरकरांच्या समस्या सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरीषद मुख्याधिकारी पद दोन वर्षापासुन प्रभारीकडे होते. अखेर पुणे जिल्हयातील राजगुरुनगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांची तुळजापूर नगरपरीषद मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील रखडलेले विकास कामांना चालना मिळेल व नगरपरीषद मधील भष्ट्राचार बाह्य लोकांचा हस्तक्षेप कमी होईल. शहरवासियांना मुलभुत सुविधा मिळतील अशा अपेक्षा शहरवासियांन मधुन व्यक्त केल्या जात आहेत. त्या पुर्ण करणार का याची उत्सुकता शहरवासियांना लागली आहे.