धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी येथे 8 मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमिकरणावर प्रेरणादाई मार्गदर्शन व शैक्षणिक,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिलांचे सन्मान सोहळा येडशी गावच्या सरपंच डॉ. सोनिया प्रशांत पवार यांच्या आध्यक्षते खाली आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा) सस्ते वारकरी मंडळाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी निमंत्रित मार्गदर्शीका कविता काळे जिल्हा परिषद सीनियर अकाउंटंट यांनी व सौ पुष्पाताई शिंदे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या महिला जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित महिला वर्गास मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच प्रिया सस्ते व डॉ. कांचन मोहिते यांची उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम समन्वयिका प्रतिमा सस्ते तसेच नंदिनी लोमटे, राधिका पवार यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा सस्ते यांनी केले. या निमित विभावरी देशमुख- इंगळे यांची नुकतेच अन्नसुरक्षा विभागात नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.