कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात महिला हक्क दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील गायरान अतिक्रमण धारकांची जनससंद व मराठवाडा स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठवाड्यातील बीड, लातुर, अंबाजोगाई,परभणी, धाराशिव या जिल्ह्यातील गायरान अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
या वेळी जनससंद बैठकीचे अध्यक्ष म्हणून परभणी येथील गायरान जमिन लढ्याचे गाडे अभ्यासक आप्पाराव मोरताटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील आझाद क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे हे होते. या बैठकिमध्ये अतिक्रमण गायरान जमीन नावे करण्यासाठी व निवासी अतिक्रमण कायम करण्यासाठी ठराव घेण्यात आला असुन संसद भवन (दिल्ली) येथे व विधान भवन (मुंबई) येथे मराठवाड्यातील गायरान धारकांच्या वतीने धडक महा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीसाठी विचामंचावर अमोल पालके, नागनाथ चव्हाण, विश्वनाथ गवारे, राम शेंडगे, रामभाऊ लगाडे, श्रावण क्षीरसागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले होते. तर आभार सुनिल कांबळे यांनी मानले.