तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात बुधवार दि. 19 मार्च रोजी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीतुळजाभवानी मंदीरात देविजींस भक्तांच्या दहीदुध पंचामृत झाल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले. त्यानंतर देविजींचा चेहऱ्यास सप्तरंग लावुन नंतर देविजींचा वस्ञावर रंग शिंपडण्यात आल्यानंतर रंग खेळण्यास आरंभ झाला. रंगपंचमी निमीत्ताने आज श्रीतुळजाभवानी मातेस पुरणावळीचा नैवध दाखविण्यात आला. मंदीरात देवीदर्शनार्थ आलेल्या भाविकांनी रंग खेळुन देवीदारी रंगपंचमी साजरी केली.
बच्चे कंपनी सकाळपासुनच पिचकरी माध्यमातून रंगाची उधळण सुरु केली. उन्हाची तीव्रता वाढु लागताच सर्वञ रंग उधळण्यास आरंभ झाला. महिलांनी आपआपल्या गल्लीत मैञीणीना रंग लावला. युवकांनी मोटार सायकल वरुन रंग उधळत रंगपंचमी “ साजरी केली. व्यापारी वर्ग आज रंगपंचमीत सहभागी झाल्याने शहरातील ऐंशी टक्के बाजार पेठ बंद होती. अनेकांनी शेतात जावुन पार्टी करुन रंगपंचमी साजरी केली.