तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठवाड्यातील सर्व प्रथम बैल गाडा शर्यत घेणारे शिवबाराजे प्रतिष्ठाण वतीने शुक्रवार दि. 28 मार्च रोजी धाराशिव रोड बोरी भारत आडेकर यांच्या शेतात मराठवाडा केसरी श्रीतुळजाभवानी चषक भव्य बैलगाडा स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धतील सर्व विजेत्यांना महंत तुकोजीबुवा यांच्या वतीने मानाचा गदा देण्यात येणार आहे.

बैलगाडी स्पर्धतील प्रथम विजेत्या संघास रोख 51हजार रुपये व मराठवाडा केसरी श्रीतुळजाभवानी चषक  आ कैलास पाटील यांच्या वतीने देण्यात येवुन गौरविण्यात येणार आहे तसेच व्दितीय विजेत्या संघास 31 हजार, तृतीय क्रमांक 21हजार रुपये चषक, चतुर्थे 11 हजार रुपये, पाचवा क्रमांक 7 हजार, सहावा क्रमांक 5 हजार रुपये या सर्व विजेत्यांना  आमदार कैलास पाटील यांच्या वतीने रोख रकमेचे वरील प्रमाणे पारितोषिक देवुन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर 1,00,000, महेश गवळी, चिन्मय मगर, रणजित इंगळे, चंद्रकांत नाईक, प्रविणराजे कदम, बाळासाहेब शिंदे, महेश पुजारी, प्रशांत अपराध, चिन्मय मगर, सुरज साठे, दुर्गादास रोचकरी, गोपाळ पवार, वैभव चोपदार यांनी सहकार्य केले आहे.

सर्व नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन घेतल्या जातील. नोंदणी दि.23/03/2025 ते 28/03/25 पर्यंत पंचाचा निर्णय अंतिम राहील. सदर मैदान शासनाच्या नियम व अटीचे पालन करुन आयोजित केले जाणार आहे.  कोणत्याही आपत्तीस आयोजक कमिटी जबाबदार राहनार नाही.  मैदान प्रेषकांनी स्वतःच्या जबाबादारीवरती पहावे. तरी ज्या बैलगाडी मालकांना यात सहभागी व्हावायाचे आहे. यांनी अर्जुन साळुंके, विकी वाघमारे,चेतन  शिंदे, दीपक निकम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. याच कार्यक्रमात कारवान श्वान प्रर्दशन शो आयोजित केला आहे. यामध्ये 22 हजार रुपयाचे बक्षिसे देण्यात येणार आहेत. 

 
Top