तुळजापुर (प्रतिनिधी) - उपविभागांतर्गत असणाऱ्या मध्यम, लघु व साठवण चौदा प्रकल्पातील दहा पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावेत व उर्वरीत सात प्रकल्पातील टंचाईच्या दृष्टीने जिथे पाणी उपसा बंद करण्याच्या आवश्यकता आहे अश्या ठिकाणी तात्काळ आदेश व्हावे. असे उपविभागीय अभियंता धाराशिव,पाटबंधारे उपविभाग 6 चे अभियंते पी. टी. कल्याणकर यांच्या स्वाक्षरी निशी काढण्यात आले आहेत.
सद्य स्थितीत खालील 4 प्रकल्पांतिल पाणीसाठा जोता पातळीच्या खाली असल्याने व सदरील प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याच्या योजना असल्यामुळे व जनावरांसाठी, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यासाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रकल्पामधील पाणी आरक्षित करण्यात यावे असे आदेशात म्हटलं आहे.
प्रकल्पाचे नाव, पाणीसाठा सदयस्थिती
अरबळी सा.त., 10.24%
दिंडेगाव ल.पा. 8.93%
वडगाव लाख सा. त. 45.360%
येमाई ल. पा. जोता पातळी
मंगरुळ ल. पा.जोतपातळी
आरळी ल. पा., जोता पातळी
हंगरगा सा. त., 24.96%
कदमवाडी सा.त., 7.38%%
या तलावांमधील पाणी तात्काळ आरक्षित करावे.
देवकुरुळी सा.त.12 22 %
केमवाडी सा. त., जोता पातळी
हरणी म. प्र., 23.71%
इटकळ ल. पा. 4.73%
छळस निलेगाव ल. पा.51.28%
काळेगांव सा.त.28.90%
कसई नांदूरी ल. पा 41.58%
कुंभारी कोरेवाडी सा. त.36.11%
हंगरगा तूळ ल. पा.39.97%
वरील सात प्रकल्पातील टंचाईच्या दृष्टीने जिथे पाणी उपसा बंद करण्याच्या आवश्यकता आहे अश्या ठिकाणी तात्काळ आदेश व्हावे. असे आदेशात म्हटले आहे.