परंडा (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपली ध्येय सिद्ध करण्यासाठी संभाषण कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्राचे प्रोफेसर डॉ. गजानन राशिनकर यांनी केले.ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून उपस्थित होते.श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे शनिवार दि.8 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 

सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी या विषयावर प्रोफेसर डॉ.गजानन राशिनकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

यावेळी व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ.महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे तसेच कनिष्ठ विभागातील सर्व महिला सहशिक्षिका उपस्थित होत्या.  

 या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना प्रोफेसर डॉ.गजानन राशिनकर यांनी सांगितले की संभाषण कौशल्य हे जीवनात यश संपादन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.ज्या विषयात करिअर करायचे आहे त्या विषयाचे भरपूर ज्ञान प्राप्त केले पाहिजे.यासाठी सॉप्ट स्किल आणि हार्ड स्किल दोन्हीही अवगत असले पाहिजे .यावेळी विद्यार्थ्यांना सहभागी करत त्यांच्याबरोबर यशस्वीतेच्या व त्यांच्या करिअरच्या संदर्भात चर्चा करण्यात आली .सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक बॅग देण्यात आली .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ संतोष काळे, भाग्यवान रोडगे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अक्षय घुमरे यांनी केले पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी करून दिला तर डॉ विद्याधर नलवडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

 
Top