धाराशिव (प्रतिनिधी)- गावोगावी जलसंधारणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले असून, शासनाने तलावांचे पुनरुज्जीवन आणि नाला खोलीकरण - रुंदीकरणासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‌‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि ‌‘नाला खोलीकरण व रुंदीकरण' या योजनांच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

प्रत्येक गावाच्या तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासनाने उचलण्याचे निश्चित केले असून,हे काम एकाच दराने संपूर्ण राज्यात होणार आहे.यासाठी ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांना जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार अर्ज करून सहभागी होता येईल. याशिवाय,तलावातून काढलेल्या गाळाचा उपयोग शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी करता यावा,यासाठी अल्पभूधारक, विधवा,दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून ठराविक दराने अनुदानही दिले जाणार आहे.

या उपक्रमाला गती देण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.मागणी अर्ज भरण्यासाठी बीजेएसने ‌‘बीजेएस डिमांड अँप उपलब्ध करून दिले असून,प्रशिक्षित समन्वयक व कार्यकर्ते जिल्हा,तालुका व गावपातळीवर ग्रामपंचायतींना आणि शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहेत.

या योजनेसाठी ‌‘सुहाना स्पाइसेस' यांनीही जनजागृतीसाठी सहकार्य केले आहे. अधिक माहिती करून घेण्यासाठी ‌‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' या शासनाच्या पोर्टल www.shiwaar.com <http://www.shiwaar.com> ला भेट द्यावी.संबंधित गावाच्या सरपंचांनी त्वरित अर्ज करून आपल्या गावातील तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

तालुकानिहाय समन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे.धाराशिव - सागर दुरुगकर (7447610008), तुळजापूर-गुलचंद व्यवहारे (9420735858),लोहारा-संतोष जैन (9850433905) कळंब-संजय देवरा (9423341416) व हर्ष अंबुरे (9422654910),वाशी- जयघोष जैन (9753322426),भूम-सुनील दुरुगवाल (70206668806),परंडा-जयकुमार जैन (9665859555), उमरगा-अरविंद देवसाळे(7028596452) आणि जिल्हा समन्वयक प्रमोद गायकवाड (9421995165) हे आहेत.तरी या योजनेच्या लाभासाठी यांचेशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.महामुनी (8999259962) आणि बीजेएसच्या श्रीमती कांचनमाला संगवे (9422935911) यांनी केले आहे.


 
Top