कळंब (प्रतिनिधी)- नुकतीच उस्मानाबाद ते औरंगाबाद व्हाया बीड रेल्वे मार्गाच्या अंतीम स्थान निश्चिती करणे साठी नवीन सर्वेक्षणास रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली असून त्यासाठी सहा कोटी रुपये मंजुर केल्याचे दि 14 फेब्रुवारी 2025 चे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

सदरील रेल्वे मार्ग कळंब शहराजवळून जावा व त्यामध्ये कळंब स्टेशन चा अंतर्भाव व्हावा यासाठी संबंधित यंत्रणे/ एजन्सी कडे पाठपुरावा करून आपल्या सोईचा रेल्वे मार्ग व कळंब रेल्वे स्थानक मंजुरी साठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे कृती समिती, कळंब गठीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी रविवार दि 16 मार्च 2025 रोजी दुपारी 04-30 वा, शिक्षण महर्षी मोहेकर कॉलेज च्या सांस्कृतिक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहुण सहभाग घ्यावा असे संयोजक डॉ रामकृष्ण लोंढे, प्रा संजय कांबळे सर व ऍड मनोज चोंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 
Top