कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील तांदुळवाडी ह.मु कळंब येथील शेतकरी भारत चोंदे यांनी कमी दाबाने वीजपुरवठा तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने लागवडीचा खर्चही न निघाल्याने हाताश होउन सिताफळ बागावर फिरविला जेसीबी.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील शेतकरी भारत चोंदे यांनी सिताफळ बागावर जेसीबी फिरवून सिताफळ बाग केली नष्ट भारत चोंदे यांनी गट नंबर 190 मधील क्षेत्रात सन 2019 मध्ये सिताफळ बागाची केली होती. पण गेली दोन ते तीन वर्षांपासून विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कमी विद्युत पुरवठा तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने व रुणवाल डिपी वरुन अनाधिकृतपणे काही शेतकऱ्यांनी विज जोडणी केल्यामुळे त्या डिपीवर खुप लोड येत असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. याकडे महावितरण कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. गेल्यावर्षी नियोजन समितीच्या बैठकीत प्रताप डिकले यांच्या शेतामध्ये नविन डिपी प्रस्ताव दाखल केला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व वेळोवेळी ट्रान्स्फर जळाल्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या सिताफळ बागावर जेसीबी फिरवून पुर्ण बाग नष्ट केली आहे. ही दुर्दैवी घटना घडली आहे. भारत चोंदे यांनी व्याजाने व बँकेकडुन कर्ज काढून सिताफळ लागवड केली व वाढवली, फुलवली. मात्र नेहमीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या नशिबी आले दुःखच सिताफळ लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केला. पण मजुरीचाच काय लागवडिचाही खर्च निघाला नाही. या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हताश झालेले शेतकरी भारत चोंदे यांनी आपल्या शेतातील सिताफळ बागावर जेसीबी फिरवून पुर्ण बाग नष्ट केली. नुकसानीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांचा पाठिशी हे सरकार उभे राहिल का ? हाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे.