कळंब (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने उस्मानाबाद- बीड- औरंगाबाद या नवीन 240 कि मी लांबीच्या रेल्वे मार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी दिली असून त्यासंबंधीचे दि 14-02-2025 चे पत्र प्रसिद्ध केले आहे. सदरील रेल्वे मार्ग उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्हा साठी गेम चेंजर ठरू शकतो असे येथील जनतेला वाटत आहे. 

नुकतेच रेल्वे मंत्रालयाने या सर्वेक्षणासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर केला असून लवकरच हे काम हाती घेतले जाईल असे बोलले जात आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कळंब शहरा जवळून नेण्यासाठी व कळंब रेल्वे स्टेशन मंजुरी साठी सर्वांनी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. यासाठी *रेल्वे कृती समिती* स्थापन करून संबंधितांकडे पाठपुरावा करून हे काम जलदगतीने करावे लागेल. असे झाल्यास कळंब शहर हे रेल्वे नकाशा वर येवू शकते यात शंका नाही. 

तरी यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी, शहरातील सजग नागरिक, पत्रकार बंधू, विविध सामाजिक संस्था- संघटना यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

 
Top