धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  रूपामाता उद्योग समुहाच्यावतीने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्काराने गौरव करण्यात आला.

धाराशिव शहरातील रूपामाता अर्बन व मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालया हा सत्कार सोहळा संपन्न झाला. संस्थेच्या संचालिका सुलभा गुंड, महानंदा माने, रूपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले व रूपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत पाडोळी (आ) येथील रुपामाता मिल्क अँड. मिल्क प्रॉडक्ट येथे कार्यरत असणाऱ्या भगिनींचा देखील सत्कार जनरल मॅनेजर बिभीषण माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदिनाथ राजळे, जनरल मॅनेजर उत्पादन, कर्मचारी वृंद सहभागी होते.

 
Top