तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यांच्या नातवाचे लग्न कार्य पार पडले होते. त्यानिमिताने धार्मिक कुलाचार, वावर याञा करण्याकरीता नवदांपत्यांसह तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्री तुळजाभवानी मातेचा वावर याञेचा कुलधर्म, कुलाचार केला. यावेळी मोहिते पाटील कुटुंबातील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र देऊन मोहिते पाटील कुटुंबीयांचा सत्कार केला. यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे, स्वच्छता निरीक्षक सुरज घुले, नितीन भोयर व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top