धाराशिव (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांची जयंती 15 मार्च रोजी यावर्षी नागपूर येथे साजरी करण्यात येणार आहे. हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या सोहळ्याला धाराशिव जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती पक्षाचे मराठवाडा झोन प्रभारी विलास शेरखाने यांनी दिली.

धाराशिव येथील विश्रामगृहात बहुजन समाज पार्टीची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य तथा मराठवाडा झोनचे प्रभारी विलास शेरखाने यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांची जयंती नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. तरी धाराशिव जिल्ह्यातून जिल्हा कमिटी विधानसभा कमिटी सेक्टर बुथ कमिटी सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते घेऊन मोठ्या उत्साहाने नागपूर शहरामध्ये मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेरखाने यांनी केले. त्यांच्या आवाहनाला  प्रतिसाद देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे त्यांना सांगण्यात आले.

या बैठकीस बहुजन समाज पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा.महादेव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, जिल्हा महासचिव प्रवीण जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष सुशील गायकवाड, जिल्हा कार्यालयीन सचिव लहू खुने, जिल्हा मीडिया प्रमुख तानाजी गायकवाड, शहराध्यक्ष बाळू साठे, उमरगा विधानसभा कोषाध्यक्ष  दीपक कांबळे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुजन समाज पार्टीवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top