तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी 2 मार्चला विविध विषयावर चर्चा केली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे 2 मार्चला कोळेकरवाडी येथे विवाह समारंभ कार्यक्रमास जात असताना महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या तेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी राज्यातील विविध राजकीय विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.