तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर धाराशिव रस्त्यावर भूसंपादीत जमिनीवर देविभक्तांचा सोयीसाठी याञा मैदान करण्याचा मागणीसाठी शहरातील महिलांनी तहसिल कार्यालया समोर सोमवार दि. 3 मार्चपासुन आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला विविध सामाजिक संघटना उपोषण स्थळी येवुन पाठींबा देत आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, तुळजापूर शहरालगत धाराशिव- छत्रपती संभाजीनगर हायवे लगत असणारे स.न. 138/1 या ठिकाणी यात्रा मैदानासाठी दि. 28/02/1998 या तारखेला 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन भुसंपादन झालेली आहे. त्या भूसंपादीत शासनाच्या जागेववरील बोगस लेआऊट रदद करून कायदेशीर कार्यवाही करुन त्याठिकाणी भाविकांचा सोयीसाठी यात्रा मैदान करण्याची मागणी केली आहे. कारण येथुन जवळच अवघ्या पाचशे मीटर अंतरावर देवीजीचे मंदिर आहे.या बाबतीत महिलांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच पालकमंञी यांना ही निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने महिलांनी आमरण उपोषण मार्ग स्विकारल्याची माहीती दिली.