तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील जवाहर नवोदय विद्यालय धाराशिवचा 12 वीचा विद्यार्थी अनिकेत अंकुश हुंबे याने नोव्हेंबर 2024 मध्ये दिल्लीतील  इंटरनॅशनल ऑलिम्पियाड फाऊंडेशनद्वारे घेण्यात आलेल्या कॉम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला.

प्राचार्य के.वाय.इंगळे यांच्या हस्ते यांच्या हस्ते चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन  त्यांचा गौरव करण्यात आला. अनिकेतला त्याचे संगणक शिक्षक यश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमास क्रीडा अध्यापक आर. एम. अलसेट उपस्थित होते.  आपल्या मार्गदर्शनपर भाषणादरम्यान के.वाय. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा घेऊन अधिक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करण्यास प्रोत्साहित केले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top