तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीचा गाभारा संवर्धनासाठी, तुळजापूर शहरातून 5240 भक्त, भाविक, शहरवासिय, व्यापारी यांचे निवेदन मंञी अशिष शेलार यांना देण्यात आले. त्यामुळे देवीचा गाभारा मोठा करावा यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

निवेदनात म्हटले आहे की, श्री देवीजींच्या गर्भगृहातील मुळ भिंतीवरील ग्रेनाईट काढून दोन महिने होत आले तरी अद्याप गर्भगृहाचे स्ट्रक्चर ऑडिट झालेले नाही. हा विषय मुर्ती गर्भगृह संदर्भात दुर्लक्षित करण्यासारखा नाही. यात  कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना जोडनाऱ्या आहेत.  गर्भगृहा बरोबरच चोपदार गाभारा, सिंह गाभारा तसेच भवानी शंकर सभामंडपातील शिळांना देखील तडे गेलेले आढळून आलेले आहे. मंञी आशिष शेलार यांना आम्ही मागणी करतो की सध्या महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने हा महत्त्वाचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडून कामास सुरुवात करण्यात यावी. आता सध्याचा मूळ गाभारा काढून तो प्रशस्त मोठा गाभारा निर्मिती करावी म्हणजे मूर्ती सुरक्षित राहील. येणाऱ्या भाविकांना लवकर व सुलभ दर्शनासाठी चांगली व्यवस्था निर्माण होईल. यावेळी सदरील निवेदन इंद्रजीत साळुंके, बाळासाहेब भोसले, किशोर  गंगणे, सागर इंगळे, मयुर कदम, जगदिश पलंगे, नितिन जट्टे सह अनेकांनी दिले.

 
Top