तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीराचा भवानी शंकर मंडप जिर्णोध्दार काम दक्षिण भारतातील मंदीरे व पीठांशी संबंधित असणारे शृंगार शारदा  पीठाचे शृंगारी जगदगुरु शंकराचार्य यांच्या सल्लानुसार करणार असल्याची माहीती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पञकार परिषद घेऊन दिली.

यावेळी पञकारांशी बोलताना पाटील म्हणाले कि, शिखर कळस काम एआयएस यांच्या अहवालानंतर होणार आहेत. तसेच भवानी शंकर जिर्णोध्दार कामासाठी आपल्या भागात योग्य असे व्यक्ती हवे होते. सर्वाचा सल्यानंतर शृंगारी मठाचे जगदगुरु शंकराचार्य यांचे नाव पुढे आले. नंतर त्यांना विनंती केली त्यांनी ती मान्य केली.

भवानी शंकर मंडपातील खांबाना क्रँक गेला असुन तिरपे झाले आहेत. या बाबतीत जिर्णोध्दार काम धर्मशास्ञ रुढी पंरपरेनुसार होण्यासाठी शृंगारी शारदा पीठाचे जगदगुरु शंकराचार्य मार्गदर्शन घेण्याचे ठरले. प्रथमता त्यांना विनंती केली नंतर त्यांनी मान्य करुन आपल्या मठाचा प्रमुख पुजारी वृदांना येथे पाठवुन   पाहणी करावायास लावली. मंदीर हे अंग असते त्या प्रमाणे ते उभारावे लागते. नंतर मुख्य पुजारी व शंकराचार्य मध्ये चर्चा झाली नंतर देविचे महंत तुकोजीबुवा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आहिरराव, तहसिलदार अरविंद बोळंगे, मी स्वता शंकराचार्य यांची भेटुन चर्चा केली. शंकराचार्य आत याचा अभ्यासकरुन धर्मशास्ञातील दाखले देवुन लेखी अहवाल देणार आहेत. नंतर पुढे काम कसे करायाचे ते ठरवले जाणार आहे. हे काम मंदीर संस्थान स्वनिधीतुन नवराञोत्सव पोर्णिमेनंतर सुरु करुन सहा महिन्यात संपवणार आहे. हे काम करताना देविच्या दैनंदिन विधी, दर्शन अखंड चालु असणार आहे. यावेळी बाळासाहेब शिंदे, आनंद कंदले, नागेश नाईक उपस्थितीत होते.

 
Top