धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिवच्यावतीने मोठ्या उत्साहात तुळजाभवानी मातेचे दुग्ध महाभिषेक व महाआरती करून साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते युवकांचे आदर्श व्यक्तिमत्व असणारे पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी माते चा दुग्ध महाभिषेक व महाआरती करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून पुढील राजकीय भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पुढील येणाऱ्या काळामध्ये पार्थ दादांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळो व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवा करण्याची संधी मिळावी. यासाठी देवीला दुग्ध महाभिषेक व महाआरती करून साकडे घालण्यात आले.
धाराशिव जिल्हा भरामध्ये पार्थ पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्यासोबत तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष समाधान ढोले, अण्णा बोंदर आदी पदाधिकारी कार्यकर्ते व राष्ट्रवादी अजितदादा प्रेमी उपस्थित होते.