कळंब (प्रतिनिधी)- आज दि 20 मार्च रोजी रूग्ण कल्याण समिती ची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी इतर विषयासह दवाखान्याच्या विस्तारित जागेचा विषय चर्चिला गेला. त्यासंदर्भात विविध पर्याय सुचविले गेले. त्यावेळी सदरील जागा शहराबाहेरील न शोधता शहरातील विविध खात्याच्या पडिक पडलेल्या जागे संबंधी चर्चा करण्यात आली आणि सदरील जागेंची डॉ धनंजय चाकुरकर यांनी प्रत्यक्ष स्वतः पाहणी केली. त्यामध्ये सद्याच्या दवाखान्या लगतची जागा,जि प चे जुने हॉस्टेल ची पडिक जागा, पं स च्या क्वॉर्टर्स ची पडिक जागा, जुने प्राथमिक आरोग्य केंद्राची पडिक जागा, जि प मुलांच्या शाळेची पडिक जागा अशी पाच ठिकाणे दाखवण्यात आली.
सर्व जागांची पाहणी करून झाल्यावर डॉ चाकुरकर साहेबांनी समाधान व्यक्त केले व जागेचा विषय लवकरच मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली.
जागेंची पाहणी करण्यासाठी त्यांच्या बरोबर रूग्ण कल्याण समिती सदस्य डॉ रामकृष्ण लोंढे, शितल घोंगडे, संतोष भांडे, सतपाल बनसोडे, बाळासाहेब कथले, मकरंद पाटील, राकेश कोमटवार.,वैद्यकीय अधिक्षक डॉ नागनाथ धर्माधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद , डॉ पुरुषोत्तम पाटील,दिपक वीर, दत्तप्रसाद हेड्डा, परशुराम कोळी उपस्थित होते.