कळंब (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजी नगर सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व जिजाऊ युवती मंच /आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८ मार्च २०२५ शनिवार रोजी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला दिन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.हनुमंत माने व प्रमुख मार्गदर्शक प्रा.मनिषा कळसकर होते.प्रमुख उपस्थितित प्रा. डॉ.विद्युलता पवार व प्रा.सुनिता चोंदे प्रा. जोशी मॅडम होते.या कार्यक्रमाची सुरुवात  प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा.मनिषा कळसकर मॅडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना संबोधित करताना महिलांचे अधिकार,त्यांचे शिक्षण महिलांच्या समस्या तसेच बालविवाह थांबणे काळची गरज या विषयी सखोल मार्गदर्शन केले.या वेळी प्रास्ताविक करताना प्रा.शफीक चौधरी यांनी महिला दिन का साजरा केला जातो. व महिला दिनाचे उद्देश व वैशिष्ट्य या विषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ.हनुमंत माने यांनी भारताची संस्कृती महान आहे.समाजातील स्त्रियांसाठी कार्य करणार्‍या देशातील महान स्त्रिया विषयी सखोल मागदर्शन केले.प्रा.डॉ. विद्युलता पवार व प्रा.सुनिता चोंदे यानी महिला दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ.हनुमंत माने यांनी केला.प्रास्ताविक प्रा.शफीक चौधरी व सूत्रसंचालन प्रा.डॉ. विद्युलता पवार यांनी केले.आभार कु.प्रतिज्ञा कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ युवती मंच,सदस्या प्रा.कळसकर मॅडम,प्रा. सुनिता चोंदे मॅडम, डॉ.विद्युलता पवार मॅडम तसेच डॉ.अनंत नरवडे, सुंदर कदम,दत्तात्रय गायकवाड व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top