कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील रांजनीच्या साई संगणक शास्त्र महाविद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापिकांचं व सर्व प्राध्यापिकांनी सर्व विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापिकांना व विद्यार्थिनींना विविध पुस्तकांच्या भेटी देण्यात आल्या.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य जे.सी.गवळी, प्रा. एन.एम. चाऊस, एम.के. साबळे, ए.डी. जाधव, डी.एल. शेळके, रवी गायकवाड, बी.डी. लांडगे, प्राध्यापिका पी.जी.मोरे, एस.आय. शिंदे, एस.एच. शेख यांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकांक्षा साळुंखे, सिद्धी काळे, दिशा बनसोडे ,स्नेहल साळुंखे, दीप्ती पाटील, वैष्णवी  पानढवळे , प्रीती महाजन,ममता सहाने,पवार,आदींनी परिश्रम घेतले. महिला दिनाच्या या उत्साहपूर्ण कार्यक्रमाने महाविद्यालयात एक आनंददायी वातावरण निर्माण केले. 

 
Top