कळंब (प्रतिनिधी)- अन्वा ता. भोकरदन, जि.जालना येथील कैलास गोविंद बोराडे  (36 वर्ष) यांचा कांही नराधमांनी अमानुषपणे छळ करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी संबंधितांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी कळंब तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. 

कैलास बोराडे यांना 1 मार्च रोजी अन्वा ता.भोकरदन येथील समाजकंटकांनी चुलीवर गरम केलेल्या लाल सळईने शरीरावर विविध ठिकाणी 16 डाग देऊन गंभीररीत्या जखमी केले. कांही जखमा शरीराच्या प्रायव्हेट पार्टवर देखील आहेत.  या पाशवी नराधमांना तात्काळ अटक करून मकोका लावावा व कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी कळंब तालुका सकल धनगर समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. अशा आशयाचे निवेदन कळंब तहसीलदार यांना देण्यात  आले. तहसीलदारांच्या वतीने गोपाळ भराडिया नायब तहसीलदार यांनी निवेदन स्विकारून वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन देण्यात आले. निवेदनावर अजित गायके, पांडुरंग लोकरे,डॉ रामकृष्ण लोंढे,संतोष घाटूळे,झेलम शिंपले,श्रीकांत मैदांड, सुभाष मैंदाड,नेताजी हारकर आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top