कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव महाविद्यालयातील एन सी सी विभागाचा विद्यार्थी झगडे कृष्णा वैजिनाथ याची इंडियन नेव्ही एसएसआर 1/2025 या बॅचमध्ये निवड झाली आहे. तो प्रशिक्षणासाठी 10 एप्रिल रोजी आयनिस चिल्का ओडिसा येथे रुजू होणार आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, अध्यक्ष अनिल मोहेकर ,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल तसेच प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव,माजी प्राचार्य सुनील पवार, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट. डॉ.के. डब्लू पावडे, लेफ्ट. सरस्वती वायबसे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, अधीक्षक हनुमंत जाधव, ग्रंथपाल अनिल फाटाक,डॉ. नामानंद साठे, डॉ. दादाराव गुंडरे, डॉ.राघवेंद्र ताटीपामुल, डॉ. मीनाक्षी जाधव,प्रा.आर्चना मुखेडकर,डॉ. ज्ञानेश चिंते, डॉ. संदीप महाजन, प्रा. दीपक वाळके, प्रा. नितीन अंकुशराव,प्रा. सुरज गपाट,प्रा.शारुख शेख, प्रा.रुपेश मानेकर, प्रा. हनुमान बुधवंत, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


 
Top