भूम (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी झुंबर शामराव गायकवाड यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष कुंदन शिंदे, कोषाध्यक्ष महेंद्र गायकवाड, सचिव अक्षय गायकवाड, मिरवणूक प्रमुख सचिन शिंदे, स्वप्निल जानराव, विकी जावळे, सदस्य म्हणून यश शिंदे, रोहित जानराव, श्रावण जावळे,कुणाल लगाडे यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून संजय शिंदे,मुकुंद लगाडे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली.

येणारा हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करून यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात पोहोचवण्याचं काम करणार असल्याचे यावेळी कमिटी अध्यक्ष यांनी सांगितले. याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top