नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरात हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा उभा करण्यात यावा. अशी मागणी भाजपचे सुनील चौधरी यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

नगरपालिकेने शहरात अनेक राष्ट्र पुरुषांचे स्मारक, पुतळे उभारले आहेत. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणांची बलिदान देऊन देव, देश, धर्म जीवंत ठेवला. अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नळदुर्ग शहरात व्हावा अशी सर्व शिवशंभू प्रेमींची इच्छा आहे. हुतात्मा निलया स्वामी यांच्या उद्याना मधील रिकामी जागा आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या आशयाचे निवेदन भाजप नेते सुनील चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

 
Top