धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथील शिवशंकर कोळी यांचा मुलगा शिवपार्थच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरांचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवचे अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवशंकर कोळी यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू सन 2017 मध्ये झाला होता. त्यावेळी कोळी यांनी शिवपार्थचे अवयदान करून एखाद्याला जीवनदान दिले. त्यापासून ते दरवर्षी त्यांच्या मुलाच्या स्मृतिदिनानिमित्त अवयव दान जनजागृती,रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. रक्तदात्यांना रुग्ण कल्याण समितीच्या वतीने रक्तदात्यांचा सन्मान ट्रॉफी व सन्मान पत्र देऊन करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे, आरोग्य मित्र रौफ शेख,उद्योजक देवानंद एडके, शासकीय रुग्णालयातील रक्त संक्रमण डॉ.विवेक कोळगे,रक्त संक्रमण अधिकारी दिनकर सुपेकर,रक्तपेढी तंत्रज्ञान इंद्रजीत साळवे.रक्तपेढी तंत्रज्ञ लक्ष्मीकांत मुंडे. रक्तपेढी तंत्रज्ञ गणेश साळुंके.जनसंपर्क अधिकारी नामदेव मुंढे.अधिपरिचारक दिलीप आवले.वाहन चालक सतीश कांबळे.रक्तपेढी परिचर सह शिवशंकर कोळी व त्यांचे कुटुंब उपस्थित होते.

 
Top