धाराशिव (प्रतिनिधी)- 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील खुल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष पद साहित्यिक लेखक गझलकार युवराज नळे यांना मिळाले. हि बाब धाराशिवकरांसाठी गौरवाची असुन दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धाराशिव येथील कवी साहित्यिक यांनी धाराशिवचा डंका पसरविणाऱ्या कविंचा सत्कार फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश उबाळे,प्रमुख पाहुणे सिनेट सदस्य देविदास पाठक,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ होते. सत्कार मुर्तीं यांनी शिव,फुले शाहु आंबेडकर यांच्या कार्यास अभिवादन करत दिल्लीतील अनुभव सांगुन आपापल्या कविता,गझल प्रसारित केल्या. साहित्यिक युवराज नळे यांनी मनोगत केले. मिना महामुनी,सोनाली अरवडे,ॲड.जयश्री तेरकर,तु.दा.गंगावणे,रविंद्र शिंदे,बाळ पाटील,यांनी काव्य वाचन केले. यावेळी पर्यटन जनजागृती संस्था धाराशिवचे अध्यक्ष, साहित्यिक लेखक गझलकार युवराज नळे, सिनेट सदस्य देविदास पाठक, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, दलित मित्र विजय गायकवाड, समितीचे गणेश वाघमारे, अंकुश उबाळे, धनंजय वाघमारे, प्रविण जगताप, संजय गजधने, बलभीम कांबळे,संपतराव शिंदे, डॉ.रमेश कांबळे, पुष्पकांत माळाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश वाघमारे यांनी केले. तर सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी केले. आभार धनंजय वाघमारे यांनी मानले.