कळंब (प्रतिनिधी)- साई मंगलम कार्यालयात येथे महिला दिना निमीत्त कळंब तालुक्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा सत्कार समारंभ आणि किशोरी मुलींच्या मेळाव्याचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्याकडून करण्यात आले.
कार्याक्रमाचे उद्घाटक आर.व्ही. चकोर गटविकास अधिकारी पंचायत समिती हे होते. भारतश्री स्नेहाताई सचिन कोकणेपाटील(पहिली भारतीय महिला प्रो कार्ड धारक महिला, भारत श्री आशिया श्री, मिस इंडिया, मिस आशिया, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, आय.एफ.बी.बी या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करणारी पहिली महिला स्पर्धक इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट, यांनी किशोरीवयीन मुलीचा आहार व व्यायामांनी सेल्फ डिफेन्स इत्यादी विषयी सखोल व्याख्यान दिले. निवेदिका व्याख्याता क्षिप्राताई मानकर (सुप्रसिद्ध व्याख्यात्या व निवेदिका) यांनी (लिंग समानता) या विषयी बोलताना जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, मुक्ता साळवे ते राष्ट्रपती, पंतप्रधान वैमानिक, डॉक्टर, वकील, इंजिनीअर बनण्यासाठी किशोरी वयीन मुलींना प्रेरणा दिली.ॲड, स्वाती जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत राज्यघटनेतील काही महत्वाच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पल्लवी तांबारे मॅडम यांनी किशोरीवयीन मुली व महिलांचे आरोग्य ॲनिमिया, वजन, उंची इत्यादी बाबी स्पष्ट केल्या .
कार्यक्रमाच्या आयोजक व कार्यक्रमाच्या अध्यक्षा बोराडे ताई भगवान(बालविकास प्रकल्प अधिकारी) यांनी जिजाऊ व सावित्रीमाईची पुस्तके वाटप करून शिक्षण घेण्यासाठी किशोरवयीन मुलींना व महिलांना प्रेरणा दिली. शिवश्री अतुल भैय्या गायकवाड यांनी मुलींना शिक्षण घेताना छेडछाड किंवा अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आव्हान केले. कार्यक्रमास विशेष उपस्थिती वनिताताई काळे (जिजाऊ ब्रिग्रेड महासचिव), डॉ. वर्षा पंडीत जाधव (जिजाऊ ब्रिग्रेड कळंब तालुका अध्यक्षा)सौ. प्रतिभा बाळकृष्ण भवर /गांगर्डे (जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा व अध्यक्षा इनरव्हील क्लब कळंब) सौ.ज्योतीताई सपाटे (महिला दक्षता कमिटी, जिल्हा विशाखा समिती, महिला बालकल्याण धाराशिव) राजश्री रवि शितोळे, पवार ए.जे., उषा गुलाब काळे, बबीताताई साळुंके, मिराताई देशमुख योगीताताई ठाकुर पंचशिला ताई सावंत, जगदेवी दिगंबर कांबळे, मृणाली सावंत, सौ. टकले मॅडम,(आरोग्य विस्तार अधिकारी ) शिवश्री रमेश आंबिरकरसर,मोठया संख्येने सेविका, मदतनीस, किशोरवयीन मुली, उपस्थित होते. मान्यवरांहस्ते आदर्श पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, किशोरवयीन मुली यांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. अनुपमा बोरफळकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अनिता थोरात, सचिन शिंदे,भिमराव गायकवाड, देशमुख पवन,नरेंद्र चौधरी यांनी केले. सौ.संगिता काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.