तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यामधील चार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाअधिकारी किर्ती किरण एच पुजार यांनी शनिवार दि. 1 मार्च रोजी काढल्याची माहिती तहसिलदार अरविंद बोळगे यांनी दिली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, धाराशिव जिल्हयातील संभाव्य पाणी टंचाई बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली. सदर वेळी उप कार्यकारी अभियंता, धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.2, उमरगा जि. धाराशिव यांनी टंचाईच्या दृष्टीने तुळजापूर तालुक्यातील  येमाई ल.पा प्रकल्प, मंगरुळ ल.पा. प्रकल्प, आरळी ल.पा. प्रकल्प व  केमवाडी सा.त. प्रकल्प ता. तुळजापूर जि. धाराशिव या प्रकल्पातील पाणीसाठा जोता पातळीच्या खाली असल्याने व सदरील प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याच्या योजना असल्यामुळे व जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी राखीव आरक्षित करण्यात यावी ही बाब बैठकीत निदर्शणास आणून दिली.

जिल्हाधिकारी धाराशिव यांनी तालुक्यातील वरील प्रमाणे नमूद चार लघू पाटबंधारे प्रकल्पात सदयस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत आरक्षित करीत आहे.असा आदेश काढला आहे.


 
Top