धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्य अभ्यासातुन सुजाण व प्रगल्भ व्यक्तीमत्व निर्माण होते असे प्रतिपादन उसवण या युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक देविदास सौदागर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त देविदास सौदागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांंनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. युवा साहित्यिक देविदास सौदागर यांनी उसवण कादंबरी निर्मिती विषयी माहिती दिली. 2007 ते 2017 या काळात कविता लिहित लिहिली. कर्णाच्या जीवनावर कवितासंग्रह प्रकाशित केला. कादंबरीत जगण मांडल. अनेक पात्र वाढवुुन जीवन अनुभव व्यक्त करता आले. दररोज जस सुचले तस लिहिल. लिखाणात सातत्य आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.
विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कक्ष अधिकारी विद्याधर गुरव यांनी प्रेमाचा झांगडगुत्ता हि कविता सादर केली व आभार मानले. कार्यक्रमास इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश चौगुले, सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे, स्व. वसंतरावजी काळे स्वाभिमान शिक्षण योजना समन्वयक प्रा. डॉ. गोविंद कोकणे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. महेश्वर कळलावे, प्रा. सचिन बस्सैयै, डॉ. अशोक हुंबे, प्रा. परिवर्तन जगझाप, डॉ. एस. मोले, डॉ. अर्चना झाकडे, चंद्रकांत आनंदगावकर, संदिप कांबळे, संजय जाधव, विश्वास कांबळे, धनराज सोमवंशी, अशोक लोंढे, नागनाथ शिंदे आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.