धाराशिव (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त यंदा भव्य आणि आकर्षक अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीची वैशिष्ट्ये म्हणजे मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर, आणि 100 मुलांचा लेझीम संघ पथकांचा भव्य जलसा हे असणार आहे.
या संदर्भात धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत मध्यवर्ती क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज चिलवंत होते या समितीच्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी अमर माळी, उपाध्यक्षपदी बळीराम माळी, सचिवपदी स्वराज जानराव, तर कोषाध्यक्षपदी सौदागर गोरे यांची निवड करण्यात आली तसेच मिरणूक प्रमुख प्रविण वाघमारे,सौरभ देशमुख,केदर गोरे, यांची निवड करण्यात आली.
क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त मध्यवर्ती जयंती धाराशिव येथे सोलापूर येथून पाच महापुरुषांचे पुतळे आणून त्यांची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकीत 100 मुलांचा लेझीम संघ पथकांचा भव्य संचलन होणार असून, संपूर्ण शहरात आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी महादेव माळी,बलराज रणदिवे,कुणाल निबांळकर, उमेशराजे निबांळकर ,मीनल काकडे, सुरज(महाराज) साळुंखे, अमित शिंदे अमरसिंह देशमुख,डाँ.सचिन देशमुख, डाँ.सुधिर शिंदे,सिध्दार्थ बनसोडे, अशोक भोसले, दत्ता माळी, चंद्रशेखर सुरवसे, पृथ्वीराज चिलवंत, सुनील ढगे, चंद्रकांत गोरे, पांडुरंग गोरे, गोविंद गोरे, सुनील गोरे, भास्कर गोरे आणि राजू माळी,रविकांत गोरे,दत्ता भोसले,देवदत्त गोरे,अँड.शंकर माळी,किशोर माळी यांची उपस्थिती व मार्गदर्शन होते.